ग्रामपंचायत भायगव्हाण

ग्रामपंचायत भायगव्हाण

ता.घनसावंगी जि.जालना

Shri Devendra Fadnavis
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
Shri Eknath Shinde
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
Smt. Sunetra Ajit Pawar
माननीय उपमुख्यमंत्री
श्रीमती सुनेत्रा अजित पवार
Shri Jaykumar Gore
माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
Shri Yogesh Kadam
माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
Shri Eknath Dawale
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. एकनाथ डवले
Varsha Thakur
जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी.जालना
श्रीमती.आशिमा मित्तल (भा.प्र.से)
Rahul Kumar Meena
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना
श्रीमती.मिन्नू .पी .एम (भा.प्र.से)
Img
उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पं),जिल्हा परिषद जालना
श्री.संदीप पवार
Img
गट विकास अधिकारी, घनसावंगी
श्री समीर जाधव
Img
सरपंच – भायगव्हाण ग्रामपंचायत श्री.भागवत राधाकिसन पुरी
Img
उप-सरपंच– भायगव्हाण ग्रामपंचायत श्री.सुनिल नारायणराव कोरडे
Img
ग्रामपंचायत अधिकारी – भायगव्हाण ग्रामपंचायतश्री.एस.आर.घोडके

गावा विषयी

मौजे भायगव्हाण हे महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात वसलेले एक प्रगत व आदर्श गाव आहे. हे गाव विभाग छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अंतर्गत येते. जिल्हा मुख्यालय जालना शहरापासून सुमारे ५५ कि.मी. अंतरावर गाव वसलेले आहे. तालुक्याचे ठिकाण घनसावंगी येथून गावास सहज वाहतूक सुविधा उपलब्ध आहे.

ग्रामपंचायत भायगव्हाणची स्थापना दिनांक ०१ मे १९६२ रोजी झाली. सन २०२१ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या १,७३६ असून त्यामध्ये ९२२ पुरुष८१४ महिला आहेत. गावात एकूण ३८२ कुटुंबे वास्तव्यास आहेत. मतदार संख्या ९७३ आहे.

गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून अनेक कुटुंबे दुग्धव्यवसाय व इतर पारंपरिक व्यवसायांवर अवलंबून आहेत. ग्रामीण जीवनशैली, सामाजिक सलोखा आणि परंपरांचे जतन ही भायगव्हाण गावाची ओळख आहे.

गावात भव्य ग्रामसंसद भवन बांधण्यात आले असून या कार्यालयामार्फत आपले सरकार सेवा केंद्र चालवले जाते. या केंद्राद्वारे सर्व नागरिकांना वेळेवर संगणकीकृत दाखले व ऑनलाईन सेवा दिल्या जातात.

गावात  हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी आणि महादेव मंदिर ही प्रमुख धार्मिक स्थळे आहेत. स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड, पिण्याचे पाणी, बाकडे व शेडची व्यवस्था करण्यात आली असून ते ठिकाण अत्यंत निसर्गरम्य आहे.

गावातील प्रत्येक घरात ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी दोन कचरा कुंड्या देण्यात आल्या आहेत.
अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांची रंगरंगोटी, डिजिटल शिक्षण प्रणाली, प्रोजेक्टर व सुंदर बेंचेस यांच्या साहाय्याने विद्यार्थी १००% उपस्थित राहून शिक्षण घेत आहेत.

भायगव्हाण हे गाव भौगोलिकदृष्ट्या अनुकूल स्थानावर वसलेले असून ग्रामपंचायत, लोकसहभाग आणि विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत सातत्याने प्रगती होत असून भविष्यात भायगव्हाण हे एक आदर्श व प्रगत ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास ग्रामस्थांना आहे.

QR कोड स्कॅन करा व कर भरा

घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी QR कोड स्कॅन करा. जलद, सुरक्षित व सोपी ऑनलाइन सेवा.

लोकसंख्या
0
कुटुंब संख्या
0
पंचायत सदस्य
0
क्षेत्रफळ
0
प्रकल्प चालू
0

🏛 ग्रामपंचायत सेवा

  • 🍚 मोफत राशन किट वाटप
  • 💧 RO शुद्ध पाणी सुविधा
  • 🚰 प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा
  • 🛠 भूमिगत गटार व्यवस्था
  • ♻ घनकचरा व्यवस्थापन व घंटागाडी
  • 📹 CCTV सुरक्षा व्यवस्था
  • 🚻 सार्वजनिक शौचालय सुविधा
  • 🪑 सार्वजनिक ठिकाणी बसण्याची सोय

🚧 विकास कामे

  • 🚿 जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पाइपलाइन
  • 🛣 भायगव्हाण ते राहेरा रस्ता मजबुतीकरण
  • 🌳 वृक्ष लागवड व संवर्धन अभियान
  • 🏫 जिल्हा परिषद शाळेमध्ये रंगरंगोटी व पेव्हर ब्लॉक
  • 💧 जलसंवर्धन व रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम

🏆 पुरस्कार व सन्मान

  • 🥇 राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच सन्मान
  • 🏅 राष्ट्रसंत गाडगेबाबा आदर्श सरपंच पुरस्कार 2025
  • 🌟 ग्राम स्वच्छता अभियान 2रे बक्षीस (FY 2024-25)
  • 🩺 टीबी मुक्त पंचायत 2023 सक्रिय सहभाग

🙏 धार्मिक व सांस्कृतिक वारसा

ग्रामदैवत हनुमान मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व महादेव मंदिर हे गावाच्या धार्मिक श्रद्धेचे केंद्र आहे. दरवर्षी हनुमान जन्मोत्सव सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केले जातात.

लोकसेवा

जन्म प्रमाणपत्र

जन्मानंतर २१ दिवसांत नोंदणी.

मृत्यू प्रमाणपत्र

मृत्यूनंतर २१ दिवसांत नोंदणी.

विवाह नोंदणी

विवाह अधिनियम 1998 नुसार.

थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र

कर थकबाकी नसल्यास.

📝 नागरिकांसाठी तक्रार / अभिप्राय

नागरिकांसाठी तक्रारी व अभिप्राय ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या समस्येची माहिती देऊन ग्रामपंचायतीस सहकार्य करा.

➡️ तक्रार / अभिप्राय नोंदवा
सरपंच भागवत पुरी

🌿 सरपंच संदेश

दि. 20 एप्रिल 2023 पासून ग्रामपंचायत भायगव्हाणच्या सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा, भूमिगत गटार व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली आहेत.

लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासन यांच्या माध्यमातून भायगव्हाणला आदर्श ग्रामपंचायत बनविण्याचा आमचा संकल्प आहे.

“लोकसहभागातूनच विकास अधिक मजबूत होतो.”
— भागवत राधाकिसन पुरी
सरपंच, भायगव्हाण
उपसरपंच सुनील कोरडे
🏆 राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच सन्मान

⭐ उपसरपंच संदेश

ग्रामपंचायत भायगव्हाणच्या उपसरपंच म्हणून कार्य करताना माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की गावाच्या विकासात प्रत्येक ग्रामस्थाचा सक्रिय सहभाग असावा. ग्रामस्थांच्या विश्वासामुळे मला राज्यस्तरीय सन्मान तसेच राष्ट्रसंत गाडगेबाबा आदर्श सरपंच पुरस्कार 2025 प्राप्त झाला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

गावामध्ये CCTV सुरक्षा व्यवस्था, RO शेड बांधकाम, भायगव्हाण ते राहेरा रस्ता मजबुतीकरण, जलसंवर्धन उपक्रम, पाणी सप्ताह, जलयुक्त शिवार अभियान अशा विविध विकासकामांमध्ये माझा सक्रिय सहभाग राहिला आहे.

स्वच्छता अभियान, ओला-सुका कचरा व्यवस्थापन, महिला बचत गट सक्षमीकरण आणि युवकांच्या सहभागातून गावाला स्वच्छ, सुरक्षित आणि प्रगत बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

“गावाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करणे हेच माझे ब्रीद आहे.”
— सुनील नारायणराव कोरडे
उपसरपंच, भायगव्हाण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतने केलेली कामे...

loader-image
हवामान अंदाज
Bhaigavhan
7:09 pm, Feb 25, 2026
temperature icon 28°C
overcast clouds
31 %
1010 mb
11 mph
Wind Gust: 17 mph
Clouds: 88%
Visibility: 10 km
Sunrise: 6:49 am
Sunset: 6:29 pm

ग्रामपंचायत कार्यालय,भायगव्हाण

ता.घनसावंगी जि.जालना

अधिकृत वेबसाइट : 🌐 gpbhaigavhan.in

SCAN ME👉

नागरिकांसाठी ऑनलाईन तक्रार व सूचना नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. खालील QR कोड स्कॅन करा आणि आपली तक्रार / अभिप्राय नोंदवा.

Grampanchayat Complaint QR Code Scan & Share with Others
तारीख नोटिस शीर्षक तपशील
०४ ऑक्टोबर २०२५
ग्रामसभा सूचना
पुढील ग्रामसभा दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५:०० वाजता ग्रामपंचायत भवन येथे होणार आहे. सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे.
३० सप्टेंबर २०२५
पाणीपुरवठा बंद सूचना
ग्रामपंचायत हद्दीत देखभाल कामांमुळे १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायं. ५ या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील.
२५ सप्टेंबर २०२५
ग्रामपंचायत कर भरणा सूचना
२०२५-२६ वर्षाकरिता घरपट्टी व पाणीकर भरण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२५ आहे. वेळेत भरणा करा.
  • जल जीवन मिशन” अंतर्गत नवीन पाईपलाईन बसविण्याचे काम सुरू.

  • गावात सौर ऊर्जेवर आधारित रस्ते दिवे बसविण्याचा प्रकल्प मंजूर.

  • स्वच्छ ग्राम – हरित ग्राम” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे.

  • ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल पेमेंट काउंटर सुरू.

  • नागरिकांसाठी “SmartGaav Citizen Portal App” लवकरच उपलब्ध होणार.

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

दाखवण्यासाठी उपलब्ध माहिती नाही

लवकरच आवश्यक तपशील येथे उपलब्ध केले जातील..

प्रमुख कार्यक्रम

लाभार्थी रजिस्टर

सरकारी योजना

गावातील छायाचित्रे , ध्वनिचित्रफित

छायाचित्र दालन

आमच्या चॅनलवर सरकारी योजना, आणि कृषी विषयावरील महत्वाचे व्हिडिओ पाहा.

आमच्या Facebook पेजला लाईक करा आणि सरकारी योजना अपडेट्स पहा

 आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सरकारी योजना व कृषी अपडेट्स मिळवा.

Instagram वर आम्हाला फॉलो करा — ताज्या अपडेट्ससाठी.कार्यक्रम आणि घोषणा यांचे अपडेट्स